अनमोल सुविचार
* विचार निरोगी असले की सुविचार सुचतात. सुविचार जीवनात दिपस्तंभाचे कार्य करतात.......
जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
*गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
*झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
*माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
*क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
*सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
*मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
*आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
*बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
*मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
*तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
*शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
*मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
*आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
*एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
*परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
*खिडकी म्हणजे आकाश नसतं.
*जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
*वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
*भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
*कविता म्हणजे भावनांचं चित्र!
*संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
*तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
*ज्याच्यामधे मानवता आहे तोच
खरा मानव !
*स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
*अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
*तुलना करावी पण अवहेलना करू नये.
*समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
*आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
*मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
*चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
*व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
*आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
*तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
*अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
*विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
*मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
*आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
*आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
*प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
*तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
*सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
*काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
*लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
*चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
*तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
*भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
*चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
*आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
*पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
*अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
*मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
*संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
*रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
*अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
*अंथरूण बघून पाय पसरा.
*कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
*तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
*अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
* चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.
*कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
*देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
*आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
*मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
*ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
*जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
*आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
*रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
*जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
*, लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
*कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार
No comments:
Post a Comment